परिभाषा पदानि . संस्कृत BAMS 1St year
परिभाषा पदानि
१) आयुर्वेद
"आयुष्यस्य वेदः आयुर्वेदः।"
जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद.
" हिताहितम सुखदुःखं आयुस्तस्य हिताहितं ।
मानं च तत्र यत्रोक्तं आयुर्वेदः स उच्चते ।।"
हितकर, अहितकर, सुखकर आणि दुःखकर अशा चार प्रकारच्या आयुष्याला योग्य काय आणि अयोग्य काय? हे सांगणारे तसेच आयुष्याचे प्रमाण सांगणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद असे म्हणतात .
2) पंचमहाभूतानि
"महान्ति भूतानि महाभूतानि ।"
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत. भूताला महा । महत् विशेषण जोडले की महाभूत शब्द तयार होतो.
| महाभूत | पृथ्वी , आप , लेज , वायु , आकाश
रस व पंचमहाभूते
- १) मधुर = पृथ्वी + जल
- २) अम्ल = पृथ्वी + अग्नि
- ३) लवण = जल + अग्नी
- ४) तिक्त = वायु + आकाश
- ५) कटु = वायु + अग्नी
- ६) कषाय = वायु + पृथ्वी
३) त्रिगुण
• "सत्व रजस्तमञ्चति प्रयः प्रोक्ता महागुणा : ।
सत्व, रज, तम हे प्रकृतिचे त्रिगुण आहेत त्यानांच महागुण किंवा परमपदार्थ असेही म्हटले जाते. सांख्य दर्शनानुसार अहंकारापासून या त्रिगुणांची उत्पत्ति सांगितलेली आहे.
सत्वगुण
"सत्वं लघुप्रकाशकं ।"
सत्वगुण हा निर्मल (पवित्र), चांगल्या गुणांनी युक्त असलेला आहे. ज्ञानी, दयाशील, अहिंसक, संतुष्ट आहे म्हणून आपण सत्पुरुषांना सात्तिक' म्हणतो.
श्रीमद्भगवदीतेमध्ये सात्विक आहाराचे वर्णन केले आहे. ताजे, मधुर, स्निग्धयुक्त, स्वच्छ, आयुष्य, बल, बुद्धी वाढविणारा आहार हा सत्वगुणी माणसाचा असतो.!
रजगुण
"उपष्टम्भकम् चलं च रजः ।
रजोगुण अभिलाषायुक्त आहे. चंचल, विषयाकडे प्रवृत्त, गतीशील, दुःखी करणारा आहे. द्वेप, गर्व, निंदा, लोग इ. अवगुणांचा आहे. लोभ हा त्याचा महत्त्वाचा दोष आहे.
याचा आहार भीमद्भगवद्वीतेत सांगितल्याप्रमाणे चमचमीत, शिखर, तळलेले पदार्थ, आंबट, रुचकर, चटकदार अशा प्रकारचा असतो. हा मनुष्य सलत विषयांशी आसक्त आसतो.
तमगुण
"गुरुत्वरणकमेन तमः प्रदीपवच्चार्थतो वृत्तिः।"
तमोगुणी मनुष्याला तामसी म्हणतात. तो मोहाकडे वळलेला अस्तो. अज्ञानी मूर्ख असतो. आळशी, अज्ञान, खोटारडा, नास्तिक असे दुर्गुण त्याचे असतात. तग म्हणजे अंधार. अज्ञानरूपी काराकडे घेऊन जाणारा ता गुण आहे. श्रीगद्गगन द्वीतेत तमोगुणी माणसाचा आहार- शिळे, वास येणारे, एक रात्र। दिवस उलटून गेलेले, अस्वच्छ, उष्टे, रसटीन असा आहे.
• त्रिगुणापैकी सत्व हा गुण आहे आणि रज, तम दोष आहेत.
४) दोषा
"दूषयन्ति दोषाः।”
ही दोषांची सर्वमान्य व्याख्या आहे. शरीर घटकांना जे दूषित करतात त्यांना दोष म्हणावे.
"वायु पिर्त्त कफञ्चेति त्रयो दोषाः समासतः।"
वायु (वात), पित्त आणि कफ हे शरीरातील त्रिदोष आहेत. दोषांमध्ये वाताचे ८०, पित्ताचे ४० व कफाचे 20 प्रकारचे व्याधी आहेत.
• दोष सर्व शरीरभर संचरण करत असताल, दोष सम अवस्थेत असतील तर निरोगी आणि वैषम्यावस्थेत असतील तर मनुष्य रोगी असतो.
• प्रत्येकाल त्रिदोष कमी अधिक प्रमाणात असतातच. दोषप्रकृति ही वातप्रधान / पित्तप्रधान / कफप्रधान अशी असते.
• दोष विकृति - मिथ्याहारविहारामुळे त्रिदोषांमध्ये क्षय (कमी होणे), वृद्धी (वाढणे), प्रकोप होने या अवस्या निर्माण होऊन रोग निर्माण होतात. व्याधीकालातील दोषांच्या अवस्थेलाच संप्राप्ति म्हणतात.
• षटक्रिया काल - सुश्रुताचार्यानी दोषांच्या विकृतीच्या अवस्था (stages) सांगितलेल्या आहेत, त्यांना षक्रिया काल म्हणतात. चय, , प्रसर, स्थानसंगय, व्यावत आणि गेद. प्रत्येक दोषांचे प्रत्येकी ५ प्रकार आहेत.
५) मला
"दोष धातु मलाः मूले हि देहस्य ।"
या मागे पाहिलेल्या सूत्रानुसार मलसुध्दा शरीराचे मूलभूत घरक आहेत. • प्रमुख मल तीन (त्रिमल) आहेत. मल (पुरीष), मूत्र, स्वेद, थाशिवाय कान, नाक इ. अवयवातून येणारा मल. मलांची क्षय, वृद्धी रोगास कारणीभूत ठरते.
मलाची कार्य
१) पुरीष (मल) - अवष्टंभ, शरीराचे बल टिकवून ठेवले. क्लेद (द्रव) बाहेर टाकणे.
2) मूत्र - शरीरातील अधिक असलेला बास्त्त (मूत्राशय) या अवयवास आधार देणे.
३) स्वेद - त्वचा ओलसर ठेवणे, रोमांच धारण करणे. ही कार्ये आहेत.
• मल ही दूष्टये आहेत. त्रिदोषांच्या विविध स्थानातील प्रकोपामुळे मल हे वृध्दी क्षय अवस्थेत जातात. त्यांची चिकित्सा वेळेवर केली पाहिजे.
६) दूष्यम्
• शरीरात दूषण निर्माण करणारे दोष असतात.
"दुष्यंती ते दोषाः।"
दोष प्रकुपित अवस्थेमध्ये एकमेकांना दूषित करतातच शिवाय धातू, मल यांनाही दूषित करतात.
वायु हा अतिशय गतिशिल आहे. कुपित झालेला पित्त। कफ जेव्हा वायुच्या संपर्कात येतो तेव्हा वायु हा योगवाही (ज्याच्याबरोबर मिळतो तसा होतो) असल्याने तो ही दूषित होतो आणि संचार केल्यावर धातू, मल यांनाही दूषित करतो.
"पित्तः पंगु, कफः पंगु, पंगवो मल धातवः । वायूना यत्र नियन्ते तत्र गच्छानी मेघवत् ।।" पित्त आणि कफ हे दोष जणू पांगळे आहेत, वायू एकटाच गतिशील आहे, म्हणून वायू घेऊन जाईल तिकडे ले जातात.
• दूष्य म्हणजे दोषांकडून दूषित होणारे शरीरातील कोणतेही घटक दूषित होऊ शकतात. सप्तधातू, त्रिमूल, स्त्रोतस सर्व दूष्य आहेत. दोषाने दूषित होणाऱ्या शरीर घटकांना दूष्य म्हणतात.
७) संसर्ग
संसर्ग याचा सरळ अर्थ संबंध (contact) येणे असा आहे, परंतु आयुर्वेदामध्ये दोन दोषामध्ये (क्षय । वृद्धि) झाली असता त्यांचा एकमेकांशी संबंध आला तर त्याला संसर्ग म्हणतात.
"संसर्गः सन्निपातश्च तत्द्वित्रिक्षयकोपतः ॥"
दोन दोषांचा संयोग म्हणजे संसर्ग यालाच द्विदोषज व्याधी म्हणतात. यापैकी एक दोष बलवान व दुसरा त्यामानाने अल्प बल असू शकतो. संसर्गाचे वात + पित्त, पित्त + कफ, वात + कफ, असे लीन प्रकार पडतात, यात जो बलवान दोष असेल त्याची चिकित्सा आधी करावी असे सांगितले आहे.
८) सन्निपात
"संसर्गः सन्निपातरच तवद्वित्रिक्षयकोपतः ।।"
याच सूत्राने सन्निपाताची व्याख्या अशी करता येईल. जेव्हा तिनही दोषांची विकृति होते ( क्षय) त्याला सन्निपात असे म्हणतात.
• यामध्ये कोणतातरी एक/दोन बलवान असू शकतात आणि एक अल्पबल असू शकतो किंवा तिनही बलवान असू शकतात.
• त्यामुळे त्याचे ७ प्रकार पडतात -
१) (वाल +), कफ, पित्त
2) (पित्त+), कफ, वात
३) (कफ +), वात, पित्त
४) (वात कफ +), पित्त
५) (वात, पित्त+), कफ
६) (पित्त, कफ+), वाल
७) वात + पित्त + कफ
• सनिपानिक रोग हे कष्टसाध्य किंवा असाध्य असतात.
९) द्रव्य
• निरुक्त्ती - द्रु गतौ (मूळ धातू) + यत् प्रत्यय = द्रव्य समवाय = नित्य.
व्याख्या अ) "द्रव्यलक्षणं तु क्रियागुणवत् समवायिकारणम् इति । (च. सू. १/५०)
ब) "द्रवति गच्छती परिणामम् इति द्रव्यम् ।" → ज्याच्यामुळे संयोग, विभाग आणि परिणाम होतात ते प्रव्य होय- 'द्रव्य' म्हणावे.
क) “क्रिया गुणवत् समवायिकारणम् इति ।" (सु.सू. ४0/2) क्रिया आणि गुण यांनी युक्त असलेला, तसेच समवायिकारणाने युक्त आहे त्याला द्रव्य म्हणतात,
ड) "रसादिनां पंचानां भूताना यद् आश्रयभूतं तद् द्रव्यम् ।" (भा.प्र.) रसवीर्यादि यांचा आश्रय असलेला, पांचभौतिक असलेला त्याला द्रव्य म्हणावे. उदा. (सर्व व्याख्यांसाठी) तुळस हे द्रव्य आहे. त्याच्यामध्ये (तिखट किंचित) रस आहे, कफनाशक हा गुण आहे. गुण आणि कार्य (क्रिया) दोन्ही तुळशीच्या आश्रयाने राहतात. तुळस अर्थातच त्यांचे समवायिकरण आहे, (त्यांच्याबरोबर नित्य सहणारे आहे. तुळस वनस्पती म्हणून पांचभौतिक आहे.)
१०) गुण
• निरुक्ती - गुण आंमंत्रणे (धातु) आकर्षित करणे - गुण.
• व्याख्या
अ) "अथ द्रव्याश्चिना रोयाः निर्गुणा निष्क्रिया गुणाः ।।" (कारिकावली)
जो द्रव्याच्या आत्मयाने राहतो, स्वतःच्या आश्रयाने राहत नाही. जो क्रिया करीत नाही ज्याच्यामध्ये 'गुणत्व' ही जाति आहे, याचा अर्थ गुण द्रव्याच्या ठिकाणी राहतात, स्वतंत्र नाही, गुण स्वतः कार्य करीत नाहीत द्रव्यच गुणांच्या सहाय्याने कार्य करते. गुणांमध्ये गुणत्व असते, जसे माणसामध्ये मनुष्यत्व असले.
ब) " समवायी तु निश्चेष्ट : कारणं गुणः ।" (च. सू. १/५९)
⇒ दुव्याशी समवाय (निव्य) संबंधाने राहणारा, निश्चेष्ट कार्य करणारा, आपल्या समान गुणाचे वर्धन करणारा असतो.
उदा. गुरुची हे आहे त्याच्या आश्रयाने गुण राहतात. 'कटुका, तिक्ता, स्वादुपाका' हे गुण आहेत. 'रसायन' कार्य द्रव्य या गुणामुळे करते. गुण स्वतः करीत नाहीत. त्यांच्यामध्ये (गुडूचीमध्ये) तसेच द्रव्य मिळवले तर या गुणांची वाढ होते.
११) कर्म
• निरुक्ति - कि (विक्षेपे) + मनिन् (प्रत्यय) = कर्मन् - कर्म.
"कर्तव्यस्य क्रिया कर्म ।" ⇒ जी क्रिया केली जाते त्याला कर्म म्हणतात.
व्याखा - (परिभाषा) "प्रयत्नादि कर्म चेष्टितम उच्यते । " (च.सू. ४९) चेष्टा म्हणजे प्रयत्न (efforts). प्रत्यक्ष कर्म केल्याशिवाय कोणत्याही कार्याची निर्मिती न होत नाही. (अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही.)
• "संयोगे च विभागे च कारणं द्रव्यमानितम् ।
कर्तव्यस्य क्रिया कर्म, कर्मनान्यदपेक्षते 11" (च.सू. 3143)
संयोग - दोन गोष्टी एकत्र आणणे, विभाग - विभाजन करने, या दोघांचे जो कारण आहे, जे द्रव्याच्या आश्रित आहे त्याला कर्म म्हणावे. क्रिया हेच कर्म आहे दुसरे नाही उदा. काही द्रव्यांचा 'संयोग मिळून औषध तयार होते, ते शरीरापासून रोगाला विभक्त (वेगळे) करते. हे सारे घडवून आणणारा वैद्य असला तर 'कर्म' करणारी द्रव्येच आहेत. द्रव्य हे कर्माच्या सहाय्याने आपले कार्य करीत असतात.
"द्रव्यामितं च कर्म, यदुच्यते कियते ।" (च. सू. ८/१३)
⇒ कर्म द्रव्यापासून वेगळे करता येत नाही. ते द्रव्यश्रित आहे. प्रसन्नता निर्माण करणे हे कर्म फुलांपासून वेगळे करता येईल का ? कर्म म्हणजे क्रिया, काम, work efforts.
१२) सामान्य
• निरुक्ति - समान गुणधर्म असलेला तो सामान्य.
• "सामान्यम् एकत्वकरम् ।
एकत्व सांगणारा तो सामान्य.
• व्याख्या "सामान्यमेकत्वकरम् तुल्यार्यता हि सामान्यम् । "
सामान्य एकत्व (एकसारखेपणा / समान गुण) दाखविणारे आहे. तुल्यार्थता हेच सामान्य आहे. म्हणजे उदा. आंबा जरी हापूस, पायरी इ. अनेक प्रकारचा असला तरी शेवटी आंबा हे समानत्व बुध्दीला सांगने ही तुल्यार्थता आहे. त्यालाच सामान्य म्हणतात.
"अनुवृत्ति प्रत्ययहेतू सामान्यम्। "
दोन पदार्थातील समान गुण ज्यामुळे समजतो तो अनुवृत्ति प्रत्यय. या प्रत्ययाचे कारण म्हणजे सामान्य होय.
"जातौ जानश्च सामान्यम् ।"
निसर्गाने प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रकार निर्माण केले आहेत. झाडे, पाने, फुले, फळे, पर्वत परंतु एकत्व बुद्धीने विचार करता या सर्वात अनेक जाती असल्यातरी पानांमध्ये पर्णत्व, फुलांमध्ये पुष्पत्व एकच आहे. माणसांमध्ये सुद्धा अनेत जाति आहेत पण मानवता / मनुष्यता हे सामान्य लक्षण आहे.
१३) विशेष
• निरुक्ति 'वि' 'शेष' (उर्वरीत / बाकीच्या । इतर) शब्दापुढच्या आधी 'वि' हा उपसर्ग लावला आहे. वि हा उपसर्ग भेद दर्शवित आहे. बाकीच्या सर्वसाधारण गोष्टींपासून वेगळा कसा हे दाखवून देणारा तो विशेष.
• "विशेषस्तु पृथकत्वकृत् विशेषस्तु विपर्यय: ।" (च.सू. ३/४५)
सामान्य पदार्थापासून वेगळा असे बुद्धीला ज्ञान. देणारा लो विशेष. पृथकत्व दाखवून देणारा तो विशेष-
"नित्यद्रव्यं वृत्तयो व्यावर्तको विशेष: । " (तर्कसंग्रह)
नित्यद्रव्यामध्ये राहणारा, पण द्रव्याचे वैशिष्ट्य बुद्धीला पटवणारा तो विशेष.
"वृद्धिः समानैः सर्वेषां विपरीतैः विपर्यय: ।" (अ.सं.सू.१/३१)
हा आयुर्वेदातला अत्यंत महत्वाचा 'सामान्य विशेष आहे । सिध्दान्त' आहे. समान गुणांची वृद्धी होते आणि विपरीत गुणांनी व्हास होतो. आता सोप्या उदाहरणातून 'विशेष' पदार्थ लक्षात घेऊ. शाळेत एका वर्गात ८० मुले आहेत. ती सर्व एकाच वर्गात आहेत हा 'सामान्य' (पदार्थ) झाला, एखादा चांगला खेळाडू 'विशेष' झाला. आयुर्वेदाने विशेष याचा अर्थ 'विपरीत' विरुध्द गुणात्मक असा अर्थ घेतला आहे. म्हणजे 'कफ दोष' अधिक झालेल्या व्यक्तिला 'स्निग्ध' पदार्थ दिला तर 'स्निग्धता' या सामान्य (समान - common) गुणाची वाढ साली. पूण रूक्ष गुणाची द्रव्ये दिली तर (विपरीत विरुद्ध) विशेष 'रुक्ष' गुणाने स्निग्ध गुणाचा ऱ्हास झाला.
१४) गुरु
• (मोठा / जड/ Heavy) हा गुण चरकाचार्यानी मानलेला आहे. गुर्वादि गुण सांगितले आहेत. त्यापैकी हा पहिला आहे.
"आद्यापतनच असमवामि कारणम् ।”
⇒ ज्या गुणामुळे पदार्थ खाली पडतो त्याचे कारण म्हणजे गुरू गुण. गुरुत्व कशामुळे येते तर पृथ्वीमधील गुरू, जड गुण आणि आप महाभूतातील क्लिन्नता यामुळे पृथ्वीच्या परमाणूतील संगठन वाढते त्यामुळे वस्तू गुरु गुणात्मक होते.
गुरुतर्पण बृहण। (सु.सू. ४६/५९८)
आयुर्वेदामध्ये गुरु गुणाचा उपयोग बृहण संतर्पण चिकित्सा करताना होतो. गुरू गुण पुष्यकारक बल देणारा, वातनाशक, जडत्व निर्माण करणारा आहे. याच्याविरुद्ध लघु गुण आहे.
१५) लघु
•"लघुस्तद् विपरीतः स्थावू लेखने रोपणस्तथा ।।" (सु.सू. ४६/५९८)
गुरुच्या विरुद्ध असलेला आणि लेखन व रोपन कार्य करणारा लघु हा गुण आहे. लघु म्हणजे (महान अल्प. यामध्ये वायू, अग्नि ही महाभूले असतात. लंङ्घन चिकित्सा करण्यासाठी लघु गुण उपयुक्त आहे.
• "लंङ्ग्बने लघुः ।" अल्प आहार किंवा हलका आहार, लवकर पचणारा आहार. तो लघु असे या गुणाचे आयुर्वेवात महत्त्व आहे. हा पचन स्त्रोतोशोधन करणारा, उत्साहवर्धक आहे. पथ्य करण्यास सांगताना अगोदर लघु आहारच देतात. शरीरातील 'स्थौल्य' (obesity deduction) करायचे असेल तर ( लघु आहार द्यावा लागत असतो .
१६) प्रकृति
• प्रकृति या शब्दाने दोन अर्थ होतात, एक सांख्य दर्शनानुसार प्रकृति- पुरुष मूल घटक ती जड प्रकृति किंवा दोषप्रकृति जी माणसांची असते. इथे दोषप्रकृति हीच अभिप्रेत आहे.
" शुक्रार्तवस्थैर्जन्माप्रदौ विश्वेणे व विष क्रियेः ।
तैच्श्र तिस्त्र : प्रकृतयो टीनमध्योत्तमाः पृथक् "
मातापित्यांच्या शुक्र आणि आर्तव यांच्या संयोगाने अपत्याची दोष प्रकृति तयार होते. ही त्रिदोषज प्रकृति दोषांच्या साम्य वैषम्यानुसार हीन - मध्यम- उत्तम अशी असते . जसे विषापासून विषकीटक निर्माण होतो तसे शुक्रआर्तवाच्या दोषस्थितीनुरून दोषप्रकृती निर्माण होते . दोषप्रकृति साम्यावस्थेत त्रिदोष असतील तर चांगली असते परंतु (वात-पित्त-कफ) वैषम्यावस्थेत असेल तर रोगकारक होते. दोषप्रकृति वालप्रधान पित्तप्रधान कफप्रधान हे शरीरक्रिया विषयात तुम्ही शिकणार आहात. दोच साम्यावस्येत असतील तर प्राकृत नसल्यास विकृत लक्षणे दिसतात.
१७) विकृति
"वायु पित्तं कफश्चेति त्रयो दोषाः समासतः ।।६।।
विकृताविकृता देह घ्नान्ति ले वर्तयन्तिय ।" (अ.ह सू. १/६-७)
शरीरामध्ये वात - पित्त-कफ हे तीन दोष असताल, जेव्हा ते प्राकृत अवस्थेत असतात तेव्हा ते देहाचे धारण करतात परंतु जेव्हा ते विकृत (विषम) अवस्थेत असतात तेव्हा विकृति निर्माण करतात.
चुकीचा आहार विहार ही दोषविकृतिला कारणीभूत असतात. विकृति झालेले दोष शरीरातील इतर घटकांना विकृत करतात आणि विकृति वाढते. भग निरनिराळ्या व्याधी होतात. व्याधीचे निदान करताना कोणत्या दोषाची। दोषांची विकृति आहे हे वैद्याने ध्यानात घ्यायला हवे, दोष-धातु-मल वृहद्धी, प्रकोप . याला विकृति म्हणतात. त्यावर योग्य चिकीत्सा झाल्यास पुन्हा ते प्राकृत होतात.
१८) चय
"संचयं च प्रकोपं च प्रसरं च स्थान संभय ।
व्याक्तं भेदं च यो वेत्ति दोषाणां स भवेद् भिषक् ॥" (सु.सू. २९/३६)
(हे सूत्र चय, प्रकोप, प्रसर, स्थान संमय प्रत्येक टीपेमध्ये लिहावे.) दोषांची स्वतःची स्थाने ठरलेली आहेत, त्याठिकाणी दोषांची वृद्धी होणे, संचय होणे, साठून राहणे म्हणजे चय ही दोषांच्या षट्क्रिया कालातील पहिली अवस्था आहे.
कोणता दोष वाढल्यावर कोणती लक्षणे - वायूसंचय - कोष्ठात जडत्व आध्यान पित्तसंचय - पीलता कफसंचय - जडता-देह तापमान कमी जो जाणतो / षट्क्रियाकाल जाणतो तो खरा वैद्य.
१९) प्रकोप
•" संचयं च प्रकोपं च प्रसरं च स्थान संश्रय ।
व्यक्ति भेदं च यो वेत्ति दोषांणा स भवेद् भिषक् ।।"
ही दूसरी अवस्था आहे. (षट्क्रिया कालातील) दोषांच्या प्रकोपामुळे जसे वात प्रकोपामुळे आम्लोद्गार (आंबट ढेकर), तृष्णा, परिदाह (आग होणे जळजळ), कफ प्रकोपामुळे अन्नदेष, हल्लास (तोंडाला पाणी सुटणे) जडत्व, आलस्य, गौरव ही लहाणे निर्माण होतात. वेळीच चिकित्सा केल्यास पुढील दोषगती टाळता येते.
20) प्रसर / प्रमर
"संचयं च प्रकोपं च प्रसरं च स्थान संश्रय ।
व्यक्तिं भेद च यो वेत्ति दोषाणां स भवेद् भिषक् ।।"
ही तिसरी अवस्था आहे. (षटक्रिया कालातील) या अवस्थेत दोषांमुळे पुढील लक्षणे दिसतात. वालाचा प्रसर झाल्यास वाल विमार्गगामी है (वेगवेगळ्या तिर्यक् । वेड्या वाकड्या दिशेने संचरण करतो, आटोप (टोचल्याप्रमाणे पोटात वेदना होतात), पित्ताचा प्रसर झाल्यास ओष ( एकाच ठिकाणी दाट irritation), चोष (चोखल्याप्रमाणे शोषल्याप्रमाणे वेदना), परिवाह (सर्वत्र दाह), धूमायन (उलटीतून धूर निघतोय असे वाटणे), कफाचा प्रसार झाल्यास अरुचि, अविपाक (Indigestion - अपचन), अंगसाद, छर्दि (उलटी) ही लक्षणे दिसतात. चिकित्सा झाल्यास पुढची दोषगती राळता येते.
23) स्थानसंश्रय
• "संचयं च प्रकोपं च प्रसरं च स्थान संश्रय ।
व्यक्तिं भेदं च यो वेत्ती दोषाणां स भवेद् भिषक् ।।"
ही षट्क्रिया कालातील ४ अवस्था आहे. प्रकुपित दोष स्वस्थान सोडून वाताबरोबर सर्वत्र (देहात) संचार करतात आणि जेथे जातील त्या ठिकाणी व्याधी निर्माण करतात. उदा. उदरात (कोष्ठात) जलोदर (Asciets), आग्नमांद्य (Anorexea), अनाह, विसूचिका (Cholera प्रमाणे), गुल्म, विदधी CAbscess), अतिसार (Diarrhoea), संधीच्या ठिकाणी सूज, वेदना, पायाच्या ठिकाणी स्लीपद (वाय सुजणे), वातरक्त (Gout), वातकंटक रोग निर्माण करतात. योग्य चिकित्सा झाल्यास पुढील दोषगात टाळता येते.
22) दोषगति, भेद
"संचयेड पहता दोषा लभन्ते नोत्तरा गती: ।
ते चूत्तरासू गतिषु भवान्त बलवत्तराः ॥" (सु.सू. २१ /३७)
सुमुताचार्यानी षटक्रियाकाल सांगितला आहे. त्यांचे वर्णन वरील सूत्रात आले आहेच. चय (संचय), प्रकोप, प्रसर, स्थानर्समय, व्याक्त, भेद या सहा अवस्था म्हणजेच गली होय. पुढे उपरोक्त (वरील) सूत्त्रात सुश्रुताचार्य सांगतात की पहिल्या म्हणजेच संचय (चय) या अवस्थेमध्ये (गतिमध्ये) प्रकुपित दोषांचे निर्धारण केल्यास दोषांना पुढच्या गति म्हणजे प्रकोप, प्रसर, स्थानसमय, व्यक्ति आणि भेद या पुढील गति प्राप्त होत नाहीत.' स्थानसभयापर्यंत सर्व गति आपण वर वर्णन केलेल्या आहेत. आता पुढच्या दोन गतिंचे वर्णन पाहूया.
• व्याक्ती - रोगाची लक्षणे स्पष्ट प्रमाणात दिसतात (व्यक्त होतात) म्हणून या ५ व्या गतिला 'व्याक्त' म्हणतात. रोगांची सर्व लक्षणे निदानापर्यंत आणतात.
उदा. - शरीराचे तापमान वाढणे- ज्वर, सरण - अतिसार, मांससंघात - अर्बुदा.
• भेदावस्था - ही शेवटची गत आहे. (काल । अवस्था). व्यक्तावस्थेत दिसणारी लक्षणे व निदान झालेले रोग असाध्य अशा अवस्थेला पोहोचतात. या ६ अवस्यांना दोषांच्या गति म्हणतात.
2३) रस
“रसाः स्वाद्वाम्ल लवण तिक्तोळाकषायका: ।।
षड द्रव्यमामिता : च यथापूर्व बला वहा:।" (अ.ह.सू. १/४)
रस ६ प्रकारचे आहेत. मधुर (गोडी), अम्ल (आंबट), लवण (खारट), तिक्त (कडू), उष्ण। कटु ( तिखट), कषाय (तुरट). हे उलट्या कुमाणे एकापेक्षा एक बल देणारे आहेत. म्हणजे कषाय अल्प बल देणारा व मधुर सर्वाधिक बल देणारा आहे. एकाच द्रव्यात एक। अनेक रस असू शकतात. आवळा पंचरसात्मक सांगितला आहे.
रस दोष संबंध
| दोष | वृद्धि | क्षय |
| वात | कटू, तिक्त, कषाय | मधुर, अम्ल, लवण |
| पित्त | अम्ल, लवण, कटु | कषाय, तिक्त, मधुर |
| कफ | मधुर, अम्ल, लवण, तिन्क्त | कटू, कपाय |
२४) वीर्यम्
"उष्णशीत गुणोत्कर्षातत्र वीर्य व्दीधा स्मृतम् । " ( अ.ह. सू. १/१७)
वीर्य म्हणजे एखाद्या दुव्यागधील शक्ति (effective power). हे शीत आणि उष्ण असे दोन प्रकारचे आहे. कटू, अम्ल, लवण हे उष्ण वीर्यात्मक रस असून तिक्त, कषाय, मधुर हे शीत वीर्यात्मक रस आहेत. उष्ण वीर्याचा प्रभाव आदान कालात असतो, तर शीतवीर्याचा प्रभाव हा विसर्गकालात असतो. जो काल उष्ण असलो, मनुष्याचे बल योडे कमी होते, तो आदान काल. त्या उलट उष्णता कमी असते, मनुष्याचे बल वाढते, तो विसर्ग काल होय.
२५) विपाक
॥" त्रिद्या विपाको यस स्वादाम्ल कटुकात्मकाः ॥"
विपाक म्हणजे काय ? घेतलेल्या आहाराचे पचन होत असतान जाठराग्निच्या संयोगाने आहारससात काही परिवर्तन होत असते. त्यालाच विपाक असे म्हणतात. (वि+पाक = विशिष्ट बदल), तो तीन प्रकारचा आहे. मधुर, अम्ल, कटू ! रस आणि विपाकांचा संबंध असा आहे. मधुर, लवण या रसांचा मधुर विपाक, आम्ल रसाचा अम्ल विपाक, कटु-तिक्त-कषाय रसांचा कटू विपाक होतो. विपाकाचे कार्य पक्काशय, बास्त (मूत्राशय), मेद्र (जननेंद्रिय) यांचे नियमन आहे.
२६) कार्यकारणभाव
• "कार्यनियतपूर्व वृत्ति कारणम् । तर्कसंग्रह.
⇒ प्रत्येक कार्याच्या पूर्वी जे निश्चितपणाने अस्तित्वात असते ते कारण होय. अशा प्रकारचा संबंध समजून घेणे म्हणजे कार्यकारणभाव. प्रत्येक कार्याच्या मागे एक / अनेक कारणे असतात. त्या कारणांचे समवायि, असमवायि, निमित्त . प्रकार आहेत.
• उदा. -
घट बनवणे हे कार्य आहे, तर कुंभार, माती, चक, काठी ही त्याची त्या घराची कारणे आहेत.
घट कार्य असेल तर माती - समवायि कारण. (नित्य असते.)
माती चक्राचा संयोग - असमवाथि कारण.
घटासाठी उपयुक्त दुय्यम कारणे चक्र, काठी निमित्त कारण,
शरीराचे कारण ५ महाभूते व आत्मा आहेत.
२७) स्त्रोतस्
• "स्त्रवणात् स्त्रोतांसि ।" (च.सं.)
शरीरात सतत पाझरत राहणाऱ्या वहनक्रियेला स्त्रोतस् म्हटले जात आहे. स्त्रोतसामध्ये जो धातु असेल त्याप्रमाणे त्याचा रंग असतो. स्त्रोतसे म्हणजे जी रसादि धातुंचे पोषण व वहन करतात ती होय. • सुभुताचार्यांनी १९ स्त्रोतसे मानली आहेत- प्राणवह, अन्नवह, उदकवह, रसवट, रक्त, मांस, मेद, मूत्र, पुरीष, शुक, आर्तवह. (सु.शा. ९/११). काही शास्त्रकारांच्या मते स्त्रोतसे अनेक आहेत.
• चरकाचार्यांनी सुभुताचार्याप्रमाणे ९ स्त्रोतसे माजली आहेत, आर्तव मानले नाही, परंतु आस्थवर, मज्जावह, स्वेदवट, ही तीन मानली आहेत. (9+3)=12 स्त्रोतसे चरकाचार्यांनी मानली आहेत.
2८) कोष्ठ
• मूल धातु कुश - आधारादौ (हघत्र कर्तारि ) भावपदार्थ वहन / ब्ठम् म्हणजे पोकळीस आवृत्त करणारी भिती कोष्ठ म्हणजे महास्त्रोतस- आचार्य सुमुतांनी आगाशय, अग्नाशय, पित्ताशय, मूत्राशय, मुख्य आहे. असे सांगितले आहे. (सु. सं. चि. 212)
• कोष्ठ - कोष्ठ याचा अर्थ अन्न किंता आहार यांच्या पचनाचे, मलविसर्जनाचे, कार्य करण्याची जागा. कोष्ठाचे ३ प्रकार सांगितले आहेत.
• कोष्ठः "क्रूरो मृदुर्मध्यो मध्यः स्यात्तै: सगैरपि।"
अ) क्रूरकोष्ट - हे वातप्राधान्य असल्याने वेदनायुक्त असून, पचनाचा वेग अनियिमित आणि मध्यम प्रतिच्या विरेचनाने परिणाम कमी होतो.
ब) मध्यमकोष्ठ - दोषांची बऱ्यापैकी साम्यावस्था असलीतरी कफप्रधान अराते. विरेचन योग्य प्रमाणात होते.
क) मृदुकोष्ठ – हे पित्तप्रधान असते. पित्ताच्या सर गुणामुळे विरेचन जास्त होते, विरेचनाच्या प्रभावावरून कोष्ठाचा प्रकार ठरवता येतो.
२९) आमम्
"उष्मणोअल्पबलत्वेन धातुमाद्यमपाचितम् ।
दुष्टमामा शयगतं रसमामं प्रचक्षते ॥" (अ.ह.सू. १३/२५)
आग्नी माद्यांमुळे योग्य पचन होत नाही. आहाराचे रसामध्ये पूर्णपणे परीवर्तन होत नाही. रसधातु अर्धवट अवस्थेत असतो. दोषांमुळे दुषीत असा रसधातु म्हणजे आम होय. संपूर्ण पचनसंस्था (Digestive system) आमाने व्याप्त होते. अरुचि, जडत्व, गौख, अपचन, मुखस्त्राव, मल मलावरोध ही आम उत्पन्न साल्याची लक्षणे. (Coated tongue) चांढरी जीभ दिसणे. यामुळे अनेक सार्वदैहिक रोग होतात. त्यांची चिकित्सा टी सांगितली आहे.
३०) विरुध्दान्नम्
• विरुध्दान्न आणि विरुध्दाहार दोन्हीचा अर्थ एकच होतो. त्यामुळे ही संकल्पना ही पुढे केली आहे ती पाहावी. • दोन । अनेक प्रकारच्या विरुद्ध गुणांच्या आहाराचा संयोग किंवा शरीराची पचनशाक्तच्या विरुध्द आहार घेतला तर हे दोन्हीही विरुद्धाहारच आहेत. याचे २० प्रकार सांगितले आहेत.
• संयोग - दोन प्रकारचा आहार घेतल्यावर त्यांच्या संयोगाने नवीन हानिकारक गुणधर्म तयार होतात.
उदा. दूध + मासे.
ब) संस्कार - (Recepy) मसाला अतिप्रमाणात वापरणे इ.
क) मात्रा - द्रव्यप्रमाण
ड) देश - पचनाला अयोग्य असे वातावरण.
ई) काल - ऋतू / वयः
फ) अवस्था- सेवन करणारा व आहार यांची स्थिती.
म) स्वभाव - आहारातील - नैसर्गिक गुणधर्म
३१) विरुध्दाहार
" विरुद्धमपि चाहारं विद्यात् विषगरोपमम् ।" (अह सू. ७/२९)
विरुध्दारार हो संकल्पना फक्त आयुर्वेद शास्त्रातच आहे. कारण आयुर्वेदशास्त्र हे केवल चिकित्साशास्त्र नसून ती एक जीवन प्रणाली आहे. विरुध्दाठार हा सुद्धा विषसमाज समजावा असे वरील स्तुत्रात म्हटले आहे. विस्थ्दाहारामध्ये प्रकार सांगितले आहेत. विरुध्द गुणात्मक आहार.
• उदा. इट्टा + कुलीय, दूध+ केळ, मांस + कडधान्य, दूध+ वटाणा, आंबट पदार्थाबरोबर दूध, कच्च्या भाज्या (Salad) + दूध, मुळा + उडीद, दही + मांस, पालेभाजी + लोणी, शिजवलेले न शिजवलेले अन्न, खीर + खिचडी, हे सर्व विरुध्दाहार / विरुद्धान्न आहेत.
३२) विदाहि
• हा आहार दुव्याचा एक गुण आहे. ज्या द्रव्याचा पाक होण्यासाठी दीर्घकाळ जावा लागतो. त्याचा पाक झाल्यानंतर आम्ल उद्गार (आंबट ढेकर) येते. तहान लागते, छातीत जळजळ होते. यालाच आधुनिक शास्त्रात Hyper Acidity म्हणतात, दाह म्हणजे जळजळणे. त्यापासून विदाह शब्द निर्माण साला आहे. मसाला, लललेले पदार्थ, ब्रेड हे विदार आहेत. त्यामुळे आम्लपित्त (Acidity) निर्माण होते.
३३) विष्टाम्भ
ज्या दुव्याचे पचन होत असताना पोटात जडपणा (उदर गौख) होतो. पाक झाल्यानंतर मल, मूत्र बध्दता (Constipation / Laine Retension) अशी लक्षणे निर्माण होतात. त्यास अवष्टम्म म्हणतात. निर्माण करणाऱ्या दुव्याला विद्धाम्म द्रव्य म्हणतात.
३४) सात्म्यम्
• (सा + आत्मम्) जे स्वतःला मानवते, अनुकुल असे वाटते, ज्याची सवय असते ते सात्म्य अन्न होय. ते तीन प्रकारचे आहे- प्रवर, मध्यम आणि अवर प्रतर म्हणजे भेष्ठ (Balanced diet) सर्व रसांगी ( झुक्त), मध्यम काटी ठराविक रसांनी युक्त, अवर म्हणजे केवल एखाद्याच रसाने युक्त अन्न चरक विमानस्थानाच्या पहिल्या अध्यायातील 20 व्या श्लोकात याचा संदर्भ आहे.
३५) ओकसात्म्यम्
• हे सात्म्याप्रमाणेच आहे. "ओकात् सात्म्य:।" सवयीने सात्म्य झालेले. म्हणजे काही लोकाना तिबरच जास्त खायची सवय असते तर काहीना गोड आवडते. त्यांची सवयच बालपणापासून लागते. त्याशिवाय दुसरा आहार चालत नाही.
• चरकानी “आठ आहाराविधी विशेषायातने" सांगितली आहेत. त्याचा अवलंब करून आहार घ्यावा. चुकीची सवय असेल तर एकदम न सोडला हळूहळू सोडावी असे ही सांगतात.
३६) देशसात्म्यम्
• (संदर्भ : चरक संहिता, विमानस्थान अ. 3/22)
आपण (देश = स्थान) ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाल पिकलेल्या धान्याच्या आहाराची आपल्याला सवय असते. दुसऱ्या देशातील आहार आपल्याला आवडत नाही / पचत नाही (सूट होत नाही) यालाच देशसात्म्य म्हटले आहे. उत्तर भारतातील लोक मोहरीचे तेल जास्त प्रमाणात वापरतात तर दक्षिण भारत । कोकण येथे खोबऱ्याचे तेल वापरतात.
३७) अत्यशनम्
• (अति + अशनम्) आपले वय, ऋतू, काल, आग्नी, पचनसंस्था, या सर्वांचा विचार न करता एकाच वेळी केवळ एखादा पदार्थ आवडला म्हणून किंवा चवीला चमचमीत वाटला म्हणून एकाच वेळी भरपूर प्रमाणात (लडस लागेपर्यंत / आकंठ) सेवन करणे हे अत्यशन होय.
• जठरातील १/३ भाग अन्न, १/३ भाग जल व १/३ भाग वायू संचरणार्थ ठेवायला सांगितला आहे. अत्यशन केल्याने अजीर्ण, आगविकार, आध्यान, आटोप, , शूल, वालविकार, पार्श्वशूल हे विकार होतात.
३८) अध्यशनम्
" विद्यान् अध्यशनं भूयो भुक्तस्योपरि भोजनम्। "
आधी घेतलेल्या आहाराचे पूर्ण पचन होण्यापूर्वी पुन्हा आहार घेणे, बाहेर कोठेतरी जेवून / खावून आले असताना पुन्हा हारी जेवणे, हघरात व्यवस्थित जेवल्यानंतर कोणाच्यातरी 'आग्रहाने पुन्हा बाटेर खाणे म्हणजे अध्यशन होय, यामुळे भयानक व्याधी निर्माण होतात.
३९) स्थानी
• "आगंतु शमयेद्दोष स्थानिनं प्रतिकृत्य वा । " (अ.ह. सू. १३/२१)
स्थानी हा शब्द या ठिकाणी वापरला आहे याचा अर्थ दोष आपापल्या स्थानात स्थित असतात त्यांना 'स्थानी 'दोष म्हणतात. (उदा. वात- पवक्ताशय) परंतु काही काल ऋतू यामुळे एखादा दोष कुपित होऊन अन्य स्थानी गेला व दुर्बल अराला तर प्रथम त्या स्थानी दोषाची चिकित्सा करावी. पण तो आगन्तु दोष बलवान असेल तर त्याची चिकित्सा आधी करावी. आगन्तु व स्थानी दोन्ही समान असतील तर दोन्हीचे शमन होईल अशी सामान्य चिकित्सा करावी.
४०) योगवाही
शरीरं नाम चेतनाधिष्ठानभूत पंचमहाभूत विकार समुदायात्मकं समयोगवाही।
शरीराची व्याख्या हो सांगितली आहे. चेतनेचे अधिष्ठान असलेले पंचमहाभूतांपासून बनलेले यांचा समयोगवाही म्हणजे यांचे एकत्र वहन । चलन (जीव असे पर्यंत) करणारे त्याला शरीर हे नाव आहे. योगवादी म्हणजे ज्याच्यामध्ये मिसळेल तसा गुण घेणारे उदा.- वायू हा योगवाही आहे. शरीरात ज्या घटकात मिसळेल तसा तो होतो. फुलांच्या गंधात मिसळून तोच गंध वायू आपल्याला देतो, प्रकुपित घटकांबरोबर वायुही प्रदुषित होतो. मध हा योगवाही सांगितला आहे.
४१) पथ्यम्
• पथ्य ही संकल्पना सर्वज्ञात आहे. आपले वय, आग्न, देश, बल यांचा विचार करून निल्याचा आहार घेणे. एखादा रोग झाल्यानंतर दोषदुष्टी, घातदुष्टी, मलदृष्टी (दोष इष्य संमूच्र्छना) यांचा विचार करून वैहा जो आहार वर्ज्य सांगतील आणि जे योग्य (रोग बरा होण्यास मदत करणारे) आहार घरक आहेत ते सांगतील त्या प्रमाणे सेवन करणे म्हणजे पथ्य होय.
४२) अपध्यम्
आपली प्रकृति, वय, ऋतू, पचनशक्ति (अग्नि) यांचा विचार न करता त्यामा प्रतिकूल आहार होणे म्हणजे अपथ्य होय. तसेच कुधान्य (वाईट) प्रकारचे धान्य अस्वच्छ, किळसवाणे, न आवडणारे हे ही अपथ्य (एखादा रोग बरा व्हावा म्हणून वैद्यानी जी गोष्ट वर्ज्य सांगितली आहे ती सेवन करणे हे अपथ्य .
४३) कृतान्नवर्ग
• रुग्णाच्या पथ्यासाठी धान्यावर निरनिराळे संस्कार करून अन्न तयार केले जाते (शिजवले जाते) से कृत + अना = तान्न . यामध्ये मण्ड, पेया विलेपी, ओदन हे प्रकार येतात. त्यात गण्ड सर्वात लघु असून बाकीचे उत्तरोतर गुरु आहेत. मण्ड-पेजेसारखा, पेया- पेज व काही प्रमाण शीले, विलेपी गंजी सारखा दाट, ओदन- मात - ही क्रमाने हनुहन्तु अग्नि पाहून देतात. यामुळे पाचन, वातानुलोमन, धातुसाम्यता, आरोग्यदायी, स्त्रोतसाना मार्दव, दीपन हे लाभ होतात.
४४) अवस्थापाक
• घेतलेल्या आहाराची रसात रूपांतर होण्याकरिता अन्नाचे (पचन-पाक) तीन अवस्थामधून होत असतो यालाच अवस्थापाक म्हणताल. त्या तीन अवस्था अशा
प्रथम अवस्था - अविदग्ध अवस्था मधुरावस्थापाक.
द्वितीय अवस्था - विदग्ध अवस्था अम्त अवस्थापाक:
तृतीय अवस्था - पक्क अवस्था कटु अवस्थापाक
संदर्भ- (च.चि. १५/८-१०)
• "अन्नस्य भुक्तमात्रस्य षड्रसस्य प्रपाकतः ।
मधुराद्याल कफोभावात् फेनभूतं उदीर्यते ॥"
प्रथम अवस्थापाकाल मधुर रसापासून फेसाप्रमाणे कफ उदीर्ण होतो. नंतर पचनक्रिया सुरू असताना आमाशयातून अधोगत विदग्ध अन्नाच्या आम्लभावातून अच्छ पित्त उदीरित होते. नंतर हे पुढे सरकलेले अन्न आमाशयातून पवकाशयाला येते. तेथे प्राप्त झालेल्या अग्निद्वारा शोषण होवून हान स्वरूप अन्नाच्या कटु भावापासून वायूची निर्मिती होते. पांच भौतिक आहारापासून त्रिदोषात्मक संघठनाच्या परिणामाची प्रक्रिया म्हणजे अवस्थापाक
४५) वेग
"वेगान् न धारयेत वाल विन्मूत्र क्षवतृस्क्षुधाम् । निद्राकासममवासज़म्मान्मुच्छर्दिरेतसाम ।। " (अ.ह.सू. ४/१)
⇒ वेग म्हणजे नैसर्गिक शारिरीक क्रियांची संवेदना. ती यांबवू नये किंवा दाबून धरू नये. वायू, मलमूत्र, शिंक, लहान, भूक, निद्रा, खोकला, श्वास, जांभई, अभु, उलटी, शुक्र हे वेग धारण केले म्हणजे योग्य वेळी विसर्जित केले नाहीत तर अनेक रोग होतात. यांना अधारणीय वेग म्हणतात. परंतु क्रोध, लोभ, मोह, काम हे वेग धारण करावेत त्याने सत्व गुण वाढतो. हे धारणीय वेग आहेत. वेग धारण केल्यामुळे होणाऱ्या व्याधीवर चिकित्साटी सांगितली आहे.
४६) शोधन
"यद ईरयेत् बहिः दोषान् । " (अ. ह. . १४/५)
जी दोषांना (प्रकुपित / दूषित) बाहेर काढण्यास प्रवृत्त करते ती शोधन चिकित्सा होय. या शोधनाचे ५ प्रकार आहेत. त्यालाच पंचकर्म म्हणतात.
१) वमन 2) विरेचन ३) निरूह बास्त ४) शिरोविरेचन ५) अनुवासन बास्ती
• सुभुताचार्यानी अनुवासन बस्तिऐवजी 'रक्तमोक्षण' सांगितले आहे. या पंचकर्माआधी स्नेहल व स्वेदन करावे लागते, त्यांना पूर्व कर्मे म्हणतात. शोधनाचे लाभ म्हणजे प्रकुपित दोष शरीरातून बाहेर आल्यामुळे व्याधी नाश होतो- निरोगी लोकांनाही पंचकर्म सांगितली आहेत.
४७) शमन
• "समीकरोति विषमान् : शमनं तच्च सप्तथा।।" (अ.ह. सू. १४/५)
जी चिकित्सा दोषांना बाहेर काढत नाही, परंतु विषम दोषाना साम्यावस्थेत आणते ती रामन चिकित्सा होय. याचे (सप्तधा) सात प्रकार आहेत. पाचन, दीपन, क्षुधा, तृष्णा, व्यायाम, आतपसेवन (कोवळ्या उन्हात बसणे), वायुसेवन- यामुळे प्रकुपित दोष साम्यावस्थेत येऊन आरोग्य प्राप्ती होते. पाचन, दीपन करणारी गुंठी, ओवा यासारखी सांगितली आहेत.
४८) लंङ्घन
"बृहण यद बृहत्वाय, लंङ्घन लाद्यवाय यत।" (अ.ह.सू. १४/2)
रोगांची चिकित्सा दोन प्रकारची करता येते.
१) संतर्पण २) अपतर्पण
त्यातील अपतर्पण म्हणजे शरीरातील दूषित घटनांचा दोष कमी करणे. यासाठी पर्याय म्हणजे लंघन चिकित्सा,
"लंङ्घने लघुः ।" देहामध्ये कर्राण होवून लघुत्व प्राप्त करणारी चिकित्सा म्हणजे लंघन. यातील द्रव्ये वायु व आईने भूतप्रधान असतात. उपवास, यव, मटकी, द्रवपदार्थ, लघु आहार.
४९) बृंहण
• "बृंहण यद बृहत्वाय, लंङ्घन लाघवाय यत।"
बृंहण म्हणजे देहातील घटकांमध्ये वाढ करणे (लंघनाच्या विरुध्द) पृथ्वी व जल महाभूतप्रधान द्रव्ये देतात. वाताचे शमन वृंहणामुळे होते. मांस, दूध, धृत, मधुर रस आणि द्रव्ये ब्रहण चिकित्सेत देतात. स्नेहन आणि स्तंभन हे बृढणाचे दोन प्रकार आहेत. वृंहणामुळे बलप्राप्ती, मांसवृध्दी होते, शरीर सुडौल होते, सौष्ठव (muscular) चांगले होते. वृंहण म्हणजेच संतर्पण होय, यामुळे सप्तधातु प्रमाणात वाढ होते.
५०) अनुपान
अनु म्हणजे एखाद्याचे लगोलग / पाठोपाठ पान म्हणजे पिणे. औषधी दुव्याबरोबर लगेच । सोबत जे पेय औषधी द्रव्याच्या गुणांची वृद्धी करणारे असते ले पेय म्हणजे अनुपान होय. शीत / उढणजल, आसव, अरिष्ट, फलाम्ल, धान्यामल, क्षौर, रस, महा अशा अनेक प्रकारे सांगितले आहे. अनुपान हे मुख्य औषधाला पूरक असावे. आचार्य वाग्भटांनी जल, तर सुभुताचार्यांनी माहेंद्र जल (पावसाचे पाणी) श्रेष्ठ अनुपान सांगितले आहे.
.
.
.
.

Comments
Post a Comment